धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव शहरातील आठवडी बाजारात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज चक्का जाम आंदोलन करून नगरपरिषदेच्या निष्क्रिय व गलथान कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला. स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, ड्रेनेज, पार्किंग, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा, सीसीटीव्ही तसेच व्यापाऱ्यांसाठी आवश्यक बाजार कट्ट्यांची उभारणी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, धाराशिवचा आठवडी बाजार हा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक असून दर आठवड्याला हजारो व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक येथे येतात. मात्र, बाजारात आजही स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांची अनुपलब्धता, पार्किंगची व्यवस्था नसणे, प्रकाश व्यवस्था नसणे, ड्रेनेजची दुरवस्था आणि सुरक्षेचा अभाव अशा अनेक गंभीर समस्या कायम आहेत. त्यामुळे व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असून आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध असूनही तेथे आवश्यक विकासकामे न झाल्याने व्यापाऱ्यांना अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत व्यवसाय करावा लागत आहे. व याच कारणाने सर्व भाजी विक्रेते रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन पोलीस प्रशासनाची दमछाक होताना दिसते. शासनाकडून मंजूर झालेला विकास निधी आठवडी बाजाराच्या विकासासाठी प्रभावीपणे खर्च करून सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान आठवडी बाजाराचा इतिहास, त्याचे पूर्वीचे स्वरूप आणि आजची झालेली दुरवस्था यावर सविस्तर भाष्य करण्यात आले. बाजाराच्या प्रश्नांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही नमूद करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बाजाराच्या समस्यांबाबत भावना व्यक्त करत प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
आंदोलनादरम्यान बाजारातील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा अभाव, शौचालयांची दुरवस्था, पार्किंगची गैरसोय, प्रकाश व्यवस्थेचा अभाव, ड्रेनेजची समस्या तसेच इतर मूलभूत सुविधांअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे निदर्शनास आणून देणारे विविध जनजागृतीपर फलक आंदोलनस्थळी प्रदर्शित करण्यात आले. या फलकांद्वारे नागरिक, व्यापारी आणि प्रशासनाचे लक्ष बाजारातील गंभीर समस्यांकडे वेधण्यात आले.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, "नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हा कोणाचाही उपकार नसून तो त्यांचा अधिकार आहे. आठवडी बाजारातील सर्व प्रश्न मार्गी लागेपर्यंत काँग्रेसचा जनहिताचा संघर्ष सुरूच राहील."
या आंदोलनाला व्यापारी, शेतकरी, ग्राहक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून पोलीस प्रशासनानेही आवश्यक सहकार्य केले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, विश्वास आप्पा शिंदे, डॉ. स्मिता शहापूरकर, सय्यद एस,राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत,अग्निवेश शिंदे,अझर पठाण,उस्मान कुरेशी, खलील सय्यद, महेबुब पटेल , बाबा मोमीन, जयसिंग पवार,हरिभाऊ शेळके,हरिदास शिंदे,हरिदास शिंदे,राजेंद्र राऊत,अशोक बनसोडे,अशोक पेठे, अभिमान पेठे, संजय गजधने,अब्दुल लतीफ,गोरोबा झेंडे, अभिषेक बागल, मन्सूर सय्यद, बालाजी राठोड, तशकिल सय्यद, संतोष घोरपडे, अतिक मुजावर, देवानंद एडके, पोपट शिंदे, महावीर चव्हाण, मिलिंद गोवर्धन, फैजल शेख यांच्यासह व्यापारी, शेतकरी, ग्राहक आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!