श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
धाराशिव: श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे सोमवार, दि. १३ जुलै रोजी इयत्ता ११ वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखा तसेच फिजिक्स वाला (JEE/NEET/IIT) व फेनॉमेनाल (CET) विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. सौ. मंजुळाताई पाटील तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य संतोष घार्गे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक कै. गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात उपप्राचार्य संतोष घार्गे यांनी विद्यालयाची गौरवशाली शैक्षणिक परंपरा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यानंतर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता १० वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. मंजुळाताई पाटील यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करत संस्थेची गौरवशाली परंपरा, फिजिक्स वाला (PW) उपक्रमातून मिळालेले NEET व JEE मधील उल्लेखनीय यश, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि संस्थेच्या भविष्यातील शैक्षणिक नियोजनाची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत महाविद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला साजेसे यश संपादन करण्याचे आवाहन केले. यावेळी फिजिक्स वाला विभाग प्रमुख अरविंद भगत व फेनॉमेनाल बॅच प्रमुख शरद सदाफुले यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रा. डी. व्ही. जाधव, प्रा. एस. एल. तेली व प्रा. ए. बी. तुंगीकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दत्तात्रय जाधव यांनी केले. यावेळी तिन्ही शाखांतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य भैय्या पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
