शिंगोलीत १६ जुलै रोजी ‘जनसंपर्क कार्यालय आपल्या दारी’ विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांसाठी एकाच ठिकाणी मार्गदर्शन व अर्ज सुविधा

 शिंगोलीत १६ जुलै रोजी ‘जनसंपर्क कार्यालय आपल्या दारी’ विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांसाठी एकाच ठिकाणी मार्गदर्शन व अर्ज सुविधा

शिंगोली | प्रतिनिधी


शिंगोली ग्रामपंचायत कार्यालय येथे गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत 'जनसंपर्क कार्यालय आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांसंदर्भात विशेष जनसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तेरणा जनसेवा केंद्र यांच्या माध्यमातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असून, नागरिकांना विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या शिबिरात घरकुल योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, पीएम किसान सन्मान निधी, आयुष्मान भारत कार्ड, वय वंदना कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, रेशनसह विविध वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी, अर्ज भरण्यास मदत आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहावे, तसेच परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या दारी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!