पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा व पेढा भरवून गौरव
मंगरुळ : - (चांदसाहेब शेख) धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दि. ११ जुलै रोजी जाहीर केलेल्या पदोन्नती यादीत तुळजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महादेव भगवान राऊत यांची सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पदावर निवड करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल तुळजापूर पोलीस ठाण्यात त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.
महादेव राऊत यांनी पोलीस दलात तब्बल ३० वर्षे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवा बजावली आहे. गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यानंतर वाशी, परांडा, कळंब आदी ठिकाणी सेवा बजावत सध्या ते तीर्थक्षेत्र तुळजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
पदोन्नतीनंतर तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी श्री महादेव राऊत यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून व पेढा भरवून सत्कार केला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री महादेव राऊत यांच्या पदोन्नतीमुळे तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या दीर्घ व निष्ठावान सेवेला मिळालेली ही योग्य दखल असल्याची भावना सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
