भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी विजय शिंगाडे यांची निवड*
मंगरुळ:-(चांदसाहेब शेख) भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा धाराशिव जिल्हाअध्यक्षपदी विजय शिंगाडे यांची दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी नियुक्तीपत्राद्वारे फेरनियुक्ती जाहीर केली आहे
विजय शिंगाडे हे भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थीदशेपासून सक्रिय कार्यकर्ते म्हणून संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात ओळखले जातात त्यांनी कसईचे सरपंच म्हणून यशस्वी कारकीर्द पार पाडून गावचा सर्वागीण विकास केला आहे तसेच तुळजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही ते सध्या कार्यरत आहेत सातत्याने शेतकरी, शेतमजूर, दिनदलीत यांच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील राहतात अशा लढवय्या कार्यकर्त्यांच्या सार्थ निवडीबद्दल संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे
तुमच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक सक्षम, सशक्त आणि जनाभिमुख होईल, असा दृढ विश्वास आहे. समाजहित, राष्ट्रहित आणि पक्षवाढीसाठी तुम्ही समर्पित भावनेने कार्य करून भारतीय जनता पार्टीची विचारधारा अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचवाल, हीच अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त करून या यशस्वी, प्रेरणादायी आणि कर्तृत्वपूर्ण कार्यकाळासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा! दिल्या आहेत