कळंब पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चार चोरीच्या मोटारसायकलींसह आरोपी जेरबंद

कळंब पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चार चोरीच्या मोटारसायकलींसह आरोपी जेरबंद

कळंब : प्रतिनिधी
कळंब पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. 115/2015, 287/2026 आणि 286/2026 मधील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना कळंब पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कारवाईत कर्नाटक पासिंगच्या ट्विस्टरसह एकूण चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर तसेच कळंब उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अजिज शेख, जुबेर काझी, पोलीस अंमलदार परमेश्वर कदम व अमोल माळी यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लखन ऊर्फ रमेश उध्देश्वर दवळी (रा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून सुमारे 70 हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!