मनसेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ता बांदर यांची नियुक्ती; राज ठाकरे यांचे नियुक्तीपत्र

मनसेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ता बांदर यांची नियुक्ती; राज ठाकरे यांचे नियुक्तीपत्र
मुंबई / धाराशिव | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब, धाराशिव, भूम, परंडा व वाशी या विधानसभा मतदारसंघांसाठी दत्ता बांदर यांची मनसे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र १६ जुलै २०२६ रोजी देण्यात आले असून, पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारधारा, ध्येय-धोरणे आणि पक्षाचे कार्यक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संघटनात्मक शिस्त पाळत कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. समाजात पक्षाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन व कार्य करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी असून, त्या कालावधीत केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही नियुक्तीपत्रात नमूद आहे.
दत्ता बांदर यांच्या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक कामाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!