No title

आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव येथे पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

धाराशिव : डॉ. व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस अंतर्गत आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, धाराशिव येथे पदवीदान समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतापसिंहजी पाटील तसेच डॉ. वीणा पाटील (डीन, शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावाच्या बळावर महाविद्यालयाचे नाव देश-विदेशात उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रमुख अतिथी संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतापसिंहजी पाटील यांनी फार्मसी व्यवसायातील नैतिक मूल्यांचे पालन करत रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तर 
 डॉ. वीणा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे ज्ञानार्जन करून समाजसेवा, संशोधन आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचे आवाहन केले. 

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. विजय सुतार होते. सूत्रसंचालन प्रा. अबोली निरवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश मते यांनी केले.

या समारंभास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!