शिवसेनेत प्रवेशानंतर ओमराजेंची विकासासाठी धडपड; सिंचनासाठी ₹५ हजार कोटींचा पाठपुरावा, तुळजाभवानी विकास आराखड्यालाही गती

शिवसेनेत प्रवेशानंतर ओमराजेंची विकासासाठी धडपड; सिंचनासाठी ₹५ हजार कोटींचा पाठपुरावा, तुळजाभवानी विकास आराखड्यालाही गती
मुंबई / धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विकासकामांवर भर दिल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांसाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव, तसेच तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला गती देण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. पाणी, सिंचन, धार्मिक पर्यटन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजकीय वर्तुळातही या घडामोडींची चर्चा रंगली असून, शिवसेनेत प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे. यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू असून, आगामी काळात सिंचन, पर्यटन आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर धाराशिवच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!