पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमवेत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन; राज्याच्या प्रगतीसाठी केली प्रार्थनापंढरपूर | प्रतिनिधी

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमवेत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन; राज्याच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना
पंढरपूर | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पावन वातावरणात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रतापजी सरनाईक यांच्या समवेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा पवित्र योग लाभला.
यावेळी विठुरायाच्या चरणी महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. राज्यात शांतता, विकास आणि सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी करण्यात आली.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत लाभलेला हा आध्यात्मिक क्षण प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विठ्ठलाच्या कृपाशीर्वादाने राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश लाभावे, अशी सदिच्छाही व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!