चार गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

 चार गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई


धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत चार गावठी पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे आणि मोटारसायकलसह दोन आरोपींना जेरबंद केले आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांमध्ये या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीदारामार्फत बालाजी बबन काळे (रा. कल्याणनगर, ता. भूम, जि. धाराशिव) व आयुष उर्फ भुऱ्या भीमा काळे (रा. जांब, ता. भूम, जि. धाराशिव) हे दोघे मोटारसायकलवरून अवैध शस्त्र घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साळुंखे नगर कमानीजवळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून चार गावठी पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एकूण २ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर कोणत्या गुन्ह्यांसाठी होणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईमध्ये सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बबीराम शिंदे, मपोहे शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, दहीहांडे, शेखरवणे व पोअं मुंगुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अवैध शस्त्रास्त्रांविरोधातील या धडक कारवाईमुळे धाराशिव जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारीविरोधातील आपली ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली असून नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!