आषाढी वारी निमित्त संत एकनाथ महाराज यांच्या पालखीसोबत पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी विश्व हिंदू परिषद, धाराशिवच्या सेवा

आषाढी वारी निमित्त संत एकनाथ महाराज यांच्या पालखीसोबत पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी विश्व हिंदू परिषद, धाराशिवच्या सेवा उपक्रमाकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव यांच्या माध्यमातून औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला.
या उपक्रमासाठी जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांनी औषधे संकलित करून मोलाचे सहकार्य केले.
यावेळी रविंद्र कदम (जिल्हा संघचालक), अ‍ॅड. अजित गुंड पाटील (जिल्हा उपाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद), चंद्रकांत गुड्ड (जिल्हा उपाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद), श्री. विजयकुमार वाघमारे (जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद), श्री. दत्तात्रय चौरे (विभाग सेवा प्रमुख, विश्व हिंदू परिषद), सौ. अ‍ॅड. विद्या वाघमारे (जिल्हा सहमंत्री, विश्व हिंदू परिषद), अ‍ॅड. मनीष वाघमारे (जिल्हा विधी प्रमुख, विश्व हिंदू परिषद), श्री. विजय हजारे (जिल्हा प्रचार व प्रसिद्धी प्रमुख, विश्व हिंदू परिषद), सौ. वर्षा हजारे (सह मातृशक्ती प्रमुख, विश्व हिंदू परिषद), श्री. गजानन पाटील, श्री. श्रीकांत साठे व श्री. पिंगळे उपस्थित होते.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे विश्व हिंदू परिषद, धाराशिवतर्फे मनःपूर्वक आभार.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!