अनिलदादा सावंत, विक्की चव्हाण यांची परंडा पंचायत समितीला सदिच्छा भेट
शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अनिलदादा सावंत व विक्की चव्हाण यांचा सत्कार; विविध विकासकामांवर चर्चा
परंडा : भूम-परंडा-वाशी तालुक्याचे भाग्यविधाते, विकासरत्न, कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुतणे, भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन अनिल (दादा) सावंत तसेच युवा उद्योजक, धाराशिव जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते विक्की चव्हाण यांनी कामानिमित्त परंडा पंचायत समिती कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित मान्यवरांच्या वतीने अनिलदादा सावंत व विक्की चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान विविध विकासकामे तसेच तालुक्यातील विविध विषयांवर उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांमध्ये चर्चा झाली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धाराशिव दत्ता (आण्णा) साळुंखे, तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक गुरुवर्य रामचंद्र घोगरे सर, शिवसेना तालुकाप्रमुख परंडा तथा पंचायत समिती सभापती आण्णासाहेब जाधव, उपसभापती परसू गवारे, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते अमोल नलवडे, शिवसेना मागासवर्गीय विभाग तालुकाप्रमुख परंडा गुलाबराव शिंदे, पंचायत समिती सदस्य विश्वास (आप्पा) लोकरे, कलावंत जिल्हाप्रमुख मांजरे महाराज, माजी शिवसेना शहरप्रमुख रणभोर महाराज, शिवसेना सोशल मीडिया परंडा तालुकाप्रमुख शहाजी ढोरे पाटील, सरपंच लोणी विनोद शिंदे, सरपंच पिंपळवाडी रुपेश काळे, माजी सरपंच लोणी शहाजी शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.