उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डॉ. तानाजीराव सावंत यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डॉ. तानाजीराव सावंत यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट!

भिवराबाई सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण; सावंत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी

पुणे | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या मातोश्री कै. श्रीमती भिवराबाई जयवंतराव सावंत यांच्या निधनाचे वृत्त समजताच पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदविला.

मातृछत्र हरपल्याने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासमवेत आमदार मा. श्री. किरण सामंत उपस्थित होते. त्यांनीही सावंत कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या.

मातोश्रींच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. अशा दुःखद प्रसंगी आप्तेष्ट, सहकारी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यक्त केलेल्या संवेदना कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी बळ देणाऱ्या ठरतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सांत्वनपर भेटीतून सावंत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्याची भावना व्यक्त झाली.

कै. श्रीमती भिवराबाई जयवंतराव सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!