आमदार मिलिंद नार्वेकर यांची माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली!
पुणे येथील निवासस्थानी सावंत कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; दुःखात सहभागी होत व्यक्त केल्या शोकसंवेदना
पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मातोश्री श्रीमती भिवराबाई जयवंतराव सावंत यांच्या निधनाने सावंत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. मिलिंदजी नार्वेकर यांनी पुणे येथील निवासस्थानी भेट देऊन सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मातृछत्र हरपल्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नसते. आईचे प्रेम, तिचा आशीर्वाद आणि तिच्या संस्कारांची शिदोरी ही प्रत्येकाच्या आयुष्यात अनमोल असते. अशा दुःखद प्रसंगी आमदार मिलिंदजी नार्वेकर यांनी सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
यावेळी त्यांनी दिवंगत श्रीमती भिवराबाई जयवंतराव सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिवंगत आत्म्यास परमेश्वराने चिरशांती प्रदान करावी आणि सावंत कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे, अशी प्रार्थना केली.
आमदार मिलिंदजी नार्वेकर यांच्या या सांत्वनपर भेटीमुळे दुःखाच्या प्रसंगी सावंत कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना व्यक्त झाली.
दिवंगत श्रीमती भिवराबाई जयवंतराव सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली!