छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

वाशी : नशामुक्त भारत अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

व्यसनांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि सामाजिक जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन यश मेडिकल फाउंडेशनच्या फिल्ड ऑफिसर स्वाती भातलवंडे मॅडम यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या जनजागृती कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!