धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड!
माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ गायकवाड यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा
धाराशिव : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ गायकवाड यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा दाखला; शिवसेनेत नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचारधारेचा दाखला देत दत्ताभाऊ गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रवेश सोहळ्यावेळी मनोहर सोपान साबळे, दादासाहेब गायकवाड, यशवंत पवार, कल्याण गायकवाड, दिनकर लांडे फौजी, किरण साबळे, जीवन लांडे, विष्णू मुरूमकर, ज्ञानदेव साबळे, नाना पटेकर, आप्पा साबळे, साहेबराव पवार, दत्तू पवार, दत्ता गवळी, दत्ता साळुंखे, रमेश मुरूमकर, हनुमंत लांडे, तात्या लांडे, सुभाष साबळे, भालचंद्र साबळे, शंकर शिंदे, विठ्ठल गायकवाड, धर्मराज साबळे, अभिमान शिंदे, बाळासाहेब ढवळे आणि किशोर गायकवाड यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, नवनाथ आप्पा जगताप, मेघराज दादा पाटील, युवराज भाऊ कोकाटे, बाळासाहेब मांगले, डॉ. चेतन बोराडे, बालाजी गुंजाळ, विशाल बापू ढगे, युवराज तांबे, अजित दादा पवार, दिलीप तेलंग, वैजनाथ म्हमाने, डॉ. विद्याधर बोराडे, आप्पासाहेब हाके, बापूसाहेब भालेराव, प्रेमदास बैरागी आणि चंद्रकांत सरडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
नवप्रवेशितांचे तानाजीराव सावंत यांच्याकडून स्वागत
पक्षप्रवेशप्रसंगी प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.