जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने पोस्टमन यांचा सत्कार

जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने पोस्टमन यांचा सत्कार 

पुणे - श्रीसाई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने G. P. O पोस्ट पुणे या ठिकाणी जाऊन पोस्टमन, पोस्ट कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डेप्युटी पोस्टमास्तर मा. श्री. भरत गवळी, एपीएम मा. श्री. आनंद कुलकर्णी, श्रीसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ चौधरी या कार्यक्रमांचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तानाजीराव कांबळे होते. प्रमुख पाहुणे आनंद क्षीरसागर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाषजी तागड, से.पो.उप प्रदीपजी क्षीरसागर, विनायकराव पवार, नागेशराव भोसले, शरदराव बोंगाळे, प्रतिक म्हस्के, सागर कोल्हाळे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना तानाजीराव कांबळे म्हणाले की भारतासाठी हा दिवस फक्त पत्रांची आठवण करून देत नाही, तर इंडिया पोस्टच्या सामाजिक आणि आर्थिक भूमिकेचाही सन्मान करतो. खाकी गणवेशातील पोस्टमन, लाल पत्रपेटी आणि हाताने लिहिलेली पत्रे आजही ग्रामीण भागात बँकिंग, विमा आणि सरकारी सेवा पोहोचवण्याचा मुख्य दुवा आहेत. ईमेल आणि व्हॉट्सअॅपच्या युगातही कायदेशीर कागदपत्रे, पासपोर्ट आणि सणांच्या शुभेच्छांसाठी टपाल सेवेला महत्त्व आहे असे त्यांनी सांगितले. व आनंद क्षीरसागर यांनी बोलताना जागतिक टपाल दिन दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1874 मध्ये स्वित्झर्लंडमधील बर्न येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ पाळला जातो, ज्यामुळे जगभरातील देश एका सामायिक टपाल जाळ्याने जोडले गेले. 1969 मध्ये टोकियो येथील UPU काँग्रेसमध्ये 9 ऑक्टोबरला अधिकृतपणे 'जागतिक टपाल दिन' म्हणून घोषित करण्यात आले. याप्रसंगी पोस्टातील अधिकारी, कर्मचारी, पोस्टमन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कुलकर्णी यांनी केले व संजयभाऊ चौधरी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!