धाराशिव जिल्हा विशेष बातमी सुकटा शिवारातील लोखंडी रॉडने केलेल्या गंभीर मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकर पोलिसांच्या जाळ्यात!

दैनिक त्रिशक्ती | धाराशिव जिल्हा विशेष बातमी 
सुकटा शिवारातील लोखंडी रॉडने केलेल्या गंभीर मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकर पोलिसांच्या जाळ्यात!
भूम पोलिसांची धडक कारवाई; लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या सुमारास आरोपीला शिताफीने अटक
भूम | प्रतिनिधी
भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकटा शिवारात पवनचक्कीच्या वादातून फिर्यादीस अडवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याच्या गंभीर प्रकरणात गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपी सचिन उर्फ भैय्या बाबन जानकर (वय ३३ वर्षे, रा. सुकटा, ता. भूम, जि. धाराशिव) यास भूम पोलिसांच्या पथकाने लोणावळा येथून शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे गंभीर मारहाण प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी व आरोपीचा शोध
याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०८/२०२५, कलम ११८(१), १११(२), १११(३), ११८(२), १२०, ११८(१), ४, ३२९(४), ३५१(३) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तत्कालीन तपास अधिकारी सपोनि बळीराम बदरवडकर यांनी तपास पूर्ण करून निष्पन्न आरोपीविरुद्ध यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
वाढदिवस साजरा करण्यासाठी येणार असल्याची मिळाली गोपनीय माहिती
दरम्यान, सदर आरोपी वाढदिवस साजरा करण्यासाठी व पार्टी करण्यासाठी लोणावळा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती परि. पोलीस उपअधीक्षक तथा भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. अमोल मोहिते यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पथकास आवश्यक सूचना देऊन आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे नियोजन केले. त्यानुसार भूम पोलिसांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने लोणावळा परिसरात सापळा रचला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी; धाराशिवसह पुणे जिल्ह्यातही गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध धाराशिव व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१. वाकड पोलीस ठाणे, पुणे : गु.र.नं. ७९/२०२५, कलम ३३६, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि.
२. दिघी पोलीस ठाणे, पुणे : गु.र.नं. २८८/२०२०, कलम ३६५, ३२३, ३२४, ५०४, ३४ भा.दं.वि.
३. भूम पोलीस ठाणे, धाराशिव : गु.र.नं. २८८/२०२३, कलम ३२४, ३२५, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, २०६ भा.दं.वि.
४. हडपसर पोलीस ठाणे, पुणे : गु.र.नं. ३१५३/२०२३, शस्त्र अधिनियम तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५.
५. वाकड पोलीस ठाणे, पुणे : गु.र.नं. ११/२०२८, मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची यशस्वी कामगिरी
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव, मा. अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, भूम यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्राधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, भूम पोलीस ठाणे श्री. अमोल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक श्री. बर्डे, पोलीस अंमलदार अमोल कवडे व जयराम क्षीरसागर यांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पाडली.
अटक आरोपीस न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!