ठाकरे गटाला लोहारा तालुक्यात मोठा धक्का!माजी तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश!

ठाकरे गटाला लोहारा तालुक्यात मोठा धक्का!

माजी तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश!

माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश; लोहारा तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग

लोहारा | प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला.

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या भूमिकेतून आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अमोल बिराजदार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे लोहारा तालुक्यातील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे लोहारा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अमोल बिराजदार यांच्या पक्षप्रवेशाचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत अमोल बिराजदार यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे लोहारा तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

 जय महाराष्ट्र! जय शिवसेना!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!