ग्रामीण पाणीपुरवठा विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा करावा — आमदार कैलास पाटील

*ग्रामीण पाणीपुरवठा विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा करावा — आमदार कैलास पाटील यांची अधीक्षक अभियंता, महावितरण यांचेकडे पत्राद्वारे मागणी*

 धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतींकडून विहिरी तसेच इतर जलस्त्रोतांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो.

 मात्र, अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांवर स्वतंत्र डीटीसी (DTC) उपलब्ध नसल्याने तसेच काही ठिकाणी वीजपुरवठा एजी (AG) फिडरवरून होत असल्यामुळे पाणीपुरवठा योजनांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होत नाही.

 पावसाचा खंड पडल्याने आधीच अनेक जलस्त्रोतांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यातच वीजपुरवठ्यात वारंवार खंड पडल्यास नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतींसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

ही बाब लक्षात घेऊन आमदार कैलास पाटील यांनी अधीक्षक अभियंता, महावितरण यांना पत्राद्वारे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून वीज कनेक्शन देऊन २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी पत्राद्वारे केली.

 गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे चालविणे शक्य होईल. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यास मदत होणार आहे असेही आ पाटील यांनी पत्रात म्हटले .

 त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विहिरी व इतर जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून वीज कनेक्शन देऊन २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पत्राद्वारे केली...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!