राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे धाराशिवमध्ये भाजपकडून स्वागत
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
धाराशिव : सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. सौ. मेघना ताई बोर्डीकर-साकोरे यांचे धाराशिव जिल्ह्यात आगमन झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ना. मेघना ताई बोर्डीकर-साकोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कामकाज होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार श्री. बसवराज पाटील, आमदार श्री. प्रविण स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री यांच्या स्वागतामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.