देगलूरमध्ये ढाणे वाघांकडून जंगी स्वागत; असोसिएशनच्या ५० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

देगलूरमध्ये ढाणे वाघांकडून जंगी स्वागत; असोसिएशनच्या ५० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

देगलूर : अखिल भारतीय ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार सय्यद कलीम मुसा तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब (राजू) पाटील सुरनर हे कार्यक्रमानिमित्त देगलूर येथे आले असता, संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात आणि जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी संघटनेच्या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी देगलूर परिसरातील विविध पदांवर तब्बल ५० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेची ध्येयधोरणे, सामाजिक बांधिलकी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रभावीपणे काम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा व राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

देगलूरमध्ये झालेल्या या जंगी स्वागतामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!