प्रभाग १३ मध्ये विकासकामांना गती!
ताजमहाल टॉकीज ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन
( सय्यद कलीम मुसा )
दर्जेदार व टिकाऊ रस्त्यांच्या निर्मितीचा संकल्प; पुढील पिढीसाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यावर भर
धाराशिव : शहरातील प्रभाग क्र. १३ मधील महत्त्वपूर्ण ताजमहाल टॉकीज ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. लोकप्रिय आमदार राणाजगजीतसिंह (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विकासकामाला सुरुवात करण्यात आली.
प्रभागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या विकासामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे. रस्त्याचे काम केवळ तात्पुरत्या स्वरूपात न करता दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने करण्यात यावे, यावर विशेष भर देण्यात येत आहे.
पुढील ३० वर्षे पुन्हा रस्त्याच्या कामाची आवश्यकता भासू नये, अशा दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यांची निर्मिती व्हावी, यासाठी आमदार राणा दादा पाटील यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विकासकामांची गुणवत्ता कायम राखत कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपणही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
या भूमिपूजन कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मराठवाडा संयोजक नितीनजी काळे यांच्यासह सभापती, नगरसेवक, पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभागातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे मानले जात असून, नागरिकांना दीर्घकाळ उपयोगी पडतील अशा सुविधांची उभारणी करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला.