शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रतापसिंह पाटील पवारांच्या भेटीला; धाराशिवच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची मागणी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रतापसिंह पाटील पवारांच्या भेटीला; धाराशिवच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची मागणी

धाराशिव : पावसाअभावी तसेच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, यासह महाडीबीटी पोर्टलवरील अडचणी आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचे असमान प्रमाण असल्याने काही ठिकाणी पिके पावसाअभावी संकटात आली आहेत, तर अतिवृष्टी झालेल्या भागांत शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या अडचणींची दखल घेऊन शासनस्तरावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रतापसिंह पाटील यांनी पवार यांच्याकडे केली.

यावेळी महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ, नुकसानभरपाई तसेच जिल्ह्यातील इतर सामाजिक प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढील काळात प्रभावी पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.

दरम्यान, शरदचंद्र पवार येत्या काही दिवसांत धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच शेतीपिकांच्या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणार आहेत.

यावेळी गटनेते तथा माजी नगराध्यक्ष नगरसेवक खलिफा भाई कुरेशी, नगरसेवक बबलू शेख, इस्माईल शेख, सुनील आंबेकर, एजाज काजी, विशाल शिंगाडे, नरसिंह मेटकरी, अशोक मामा देवकते, पंकज भोसले, सर्फराज कुरेशी तसेच अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष सुरज वडवले उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा निर्धार प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!