बिलोलीत पुन्हा निवेदन; कामांची स्थळपाहणी करून चौकशी अहवाल देण्याची मागणी
बिलोली : रोजगार हमी योजनेतील विविध कामांबाबत १३ जानेवारी २०२५ रोजी तक्रार करूनही तब्बल १९ महिन्यांहून अधिक काळ चौकशी न झाल्याचा आरोप करीत अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार असोसिएशनच्या वतीने पंचायत समिती बिलोलीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देण्यात आले.
तक्रारीतील कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून AS, TS, MB, मस्टर रोल, बिले, Geo-tag/GPS नोंदी व खर्चाची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदीत कामे पूर्ण दाखविण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष कामांची स्थिती तपासावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
१९ महिन्यांपासून तक्रार प्रलंबित का? चौकशी कुठे अडकली? असा सवाल उपस्थित करीत चौकशी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करून अहवालाची प्रत तक्रारदारांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी हरिदास श्रीरामे, साईनाथ शिनगारे, रामकिशन भत्ते, बालाजी येरमलू, बाळासाहेब चेट्टे, ज्ञानेश्वर संगनाळे, नागनाथ आवळगे आदी उपस्थित होते.
— प्रतिनिधी : हरिदास श्रीरामे