जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव येथे

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव येथे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या गरजा आणि आत्मविश्वासाचा विचार करणारा हा उपक्रम शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.
या कार्यक्रमास विकास तळेकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी,पंचायत समिती सदस्य श्री.प्रदीप  मोटे, पारगावचे सरपंच श्री. महेश  कोळी, ग्रामपंचायत सदस्य श्री समाधान मोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सलीम भाई शेख, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विठ्ठल अण्णा मोटे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकरूपता, शिस्त, आत्मविश्वास आणि शाळेविषयीचा अभिमान निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. सपकाळ सर व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळेत सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
“विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच शाळेच्या प्रगतीचे खरे मोजमाप!” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले.
शाळा, ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित सहभागातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्माण होत असलेले हे सकारात्मक वातावरण निश्चितच प्रेरणादायी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!