माहेर मंगळागौरी महोत्सव २०२६
आमच्या स्नुषा डॉ. साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरी सोहळ्यानिमित्त
खास महिलांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शन
‘अगं आई अहो आई’
सासू-सुनेच्या नात्याची नवी, सुंदर गोष्ट!
श्रावणातील मंगळागौरी म्हणजे आनंद, उत्साह आणि माहेरच्या आठवणींना उजाळा देणारा सण.
यंदाची मंगळागौर साक्षी मल्हार पाटील यांचा सासरी पहिला मंगळागौरीचा सोहळा म्हणून अधिक खास!
या आनंदाच्या क्षणी माहेरच्या मायेने, प्रेमाने आणि आपुलकीने धाराशिवच्या महिला भगिनींसाठी खास ‘अगं आई अहो आई’ या लोकप्रिय मराठी चित्रपटाचे विशेष सादरीकरण.
आई-मुलगी, सासू-सून आणि कुटुंबातील प्रेमाची नवी नाती सांगणाऱ्या
या सुंदर चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी सर्व महिला भगिनींना मनःपूर्वक आमंत्रण!
सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६
सायंकाळी ५:०० वाजता
📍 स्थळ : तेर निवासस्थान
चला तर मग...
डॉ. साक्षीच्या पहिल्या मंगळागौरीचा आनंद
चित्रपटाच्या सुंदर आठवणींसोबत साजरा करूया!
आपलीच,
सौ. अर्चना रणाजगजितसिंह पाटील
अध्यक्ष, जिल्हा परिषद, धाराशिव