स्वातंत्र्यदिनी शाळांमध्ये कवायत संचलन सादरीकरणाचे शासनाचे आदेश* ... इंदापूर (संतोष पवार) १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा स्वातंत्र्य दिन अत्यंत शिस्तबद्ध आणि

*स्वातंत्र्यदिनी शाळांमध्ये कवायत संचलन सादरीकरणाचे शासनाचे आदेश* ... इंदापूर (संतोष पवार) १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा स्वातंत्र्य दिन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व शिक्षण संचालकांनी शाळांना मार्गदर्शक सूचना देऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व माध्यमांच्या सरकारी तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये देशभक्तीपर वातावरणात विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिलेले आहेत. त्यानुसार ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा संपल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुमारे वीस मिनिटांचे सामूहिक कवायत संचलन आयोजित केले जाईल . प्रभातफेरी, ध्वजारोहण राष्ट्रगीत ,राज्यगीत संविधानाच्या सरनाम्याचे वाचन, देशभक्तीपर गीत गायन आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता भाषण स्पर्धा, देशभक्तीपर कविता वाचन, नृत्य स्पर्धा देशभक्तीवर आधारित चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा हस्तकलांचे व खेळांचे आयोजन करण्याबाबतचे निर्देश करण्यात आले आहेत. सदरच्या कवायत संचलन उपक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो स्कूल पोर्टल वरील मुख्याध्यापकांच्या लॉगिन मध्ये अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. संबंधित कार्यक्रमाचा व्यावसायिक माहितीपट आणि डिजिटल अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे द्वारे शासनाला सादर केला जाणार आहे.   गतवर्षी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर यंदाही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याबाबतचे आदेश शालेय  शिक्षण विभागाने दिलेले आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!