दहा जनावरांसह दोन पिकअप असा १८ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

दहा जनावरांसह दोन पिकअप असा १८ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव ग्रामीण पोलिसांची कारवाई; हिवरा व भोनगिरी येथील दोघे आरोपी ताब्यात

धाराशिव, दि. २७ : धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दहा जनावरे व दोन पिकअप वाहने असा एकूण १८ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक २७/०७/२०२६ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८७/२६, भा.प्रा.प्र.का. १९६० कलम ११(१)(ब) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ ए(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात मपोह/१३२७ शोभा शेषेराव बांगर, ने. स्थागुशा. धाराशिव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान दशरथ शंकर जगदाळे (वय ५२, रा. हिवरा, ता. भूम, जि. धाराशिव) आणि बालाजी भिकाजी सोनवणे (वय ३८, रा. भोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दहा जनावरे व दोन पिकअप वाहने असा एकूण १८ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

ही कारवाई मा. पोनि. श्री. विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ/५४७ जाधव, पोहेका/१००३ वाघमारे, पोना/१६३१ ढगारे, पोका/५८४ बोईनवाड, चापोका/६६० शेरखाने व क्यूआरटी पथकाने केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!