लोहाऱ्यात भव्य इस्लामिक पुस्तक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; समाजजागृतीचा ज्ञानयज्ञ !'वाचाल तर टिकाल' संदेशातून वाचन संस्कृतीला चालना; इस्लामिक मराठी पब्लिकेशन, मुंबईचा उपक्रम(लोहारा प्रतिनिधी)

लोहाऱ्यात भव्य इस्लामिक पुस्तक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; समाजजागृतीचा ज्ञानयज्ञ !
'वाचाल तर टिकाल' संदेशातून वाचन संस्कृतीला चालना; इस्लामिक मराठी पब्लिकेशन, मुंबईचा उपक्रम
(लोहारा प्रतिनिधी)
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. ११ जुलै रोजी इस्लामिक मराठी पब्लिकेशन, मुंबई यांच्या वतीने भव्य इस्लामिक पुस्तक प्रदर्शन व पुस्तक विक्रीचे आयोजन करण्यात आले. शेख मुसा मोबाईल बुक व्हॅनचे प्रमुख व वाहनचालक अतामोहम्मद यांच्या अथक परिश्रमातून हा समाजजागृतीपर उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
"वाचाल तर टिकाल" हा संदेश देत वाचन संस्कृती रुजविणे, दर्जेदार साहित्य सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचविणे आणि समाजात ज्ञानाचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उद्घाटन प्रकाश भगत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
प्रेषित मोहम्मद (स.) यांनी मानवतेसाठी दिलेल्या ईश्वरी संदेशाचा परिचय करून देणारी तसेच सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक प्रबोधन करणारी विविध पुस्तके प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि इस्लाम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे, साने गुरुजी लिखित प्रेषित मोहम्मद, दारूबंदी आणि इस्लाम, स्त्री आणि इस्लाम, आदर्श कुटुंब यांसह विविध समकालीन विषयांवरील पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध होती.
इस्लामी साहित्य, दुर्मिळ पुस्तके आणि ज्ञानाचा अमूल्य ठेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने अनेक वाचनप्रेमींनी प्रदर्शनाला भेट देत मोठ्या उत्साहाने पुस्तकांची खरेदी केली. समाजात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि वैचारिक प्रबोधन घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी यावेळी मत व्यक्त केले.
यावेळी सलीम भाई शेख, हाजी बाबा शेख, रौफ बागवान, श्याम मोहम्मद खानापुरे, शब्बीर गवंडी, उपनगराध्यक्ष आमीन सुबेकर ,माजी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख,नगरसेवक जालिंदर कोकणे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, हरी लोखंडे, सय्यद इनामदार, हैदर फकीर, भागवत कांबळे, बशीर खडीवाले, नजीर फकीर, जमात-ए-इस्लामी हिंदचे जिल्हा संघटक सलीम मणियार, पत्रकार तानाजी माटे, अब्बास शेख,निळकंठ कांबळे, इकबाल मुल्ला, जसवंतसिंह बायस, अशोक दुबे, गिरीश भगत, गणेश खबुले, यशवंत भुसारे, सुमित झिगाडे विंक्रात संगसेट्टी सुनील ठेले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समाजजागृतीपर ज्ञानयज्ञात सहभागी होत अनेक वाचनप्रेमींनी दर्जेदार साहित्याचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!