आठवडी बाजारातील मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे आज चक्का जाम आंदोलन
धाराशिव, दि. १९ जुलै : धाराशिव शहरातील आठवडी बाजार परिसरात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्यांच्या निषेधार्थ धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (रविवार) चक्का जाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आठवडी बाजारातील स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, सार्वजनिक शौचालयांची गैरसोय, पार्किंगची समस्या, ड्रेनेज व्यवस्था, अपुरी प्रकाश व्यवस्था, सुरक्षेचा प्रश्न, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इतर मूलभूत सुविधांची तातडीने पूर्तता करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धनंजय रामभाऊ राऊत यांनी दिली आहे.
हे आंदोलन रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता ताजमहाल टॉकीजसमोर, आठवडी बाजार, धाराशिव येथे होणार असून, नागरिकांनी तसेच सर्व दैनिके, वृत्तवाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आंदोलनाचे वृत्तांकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
– धनंजय रामभाऊ राऊत