पारगाव येथे मोफत मका बियाणे वाटप; शेतकरी व पशुपालकांना दिलासा

पारगाव येथे मोफत मका बियाणे वाटप; शेतकरी व पशुपालकांना दिलासा

पारगाव | प्रतिनिधी

धाराशिव जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत गरजू शेतकरी व पशुपालकांसाठी मोफत मका बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. पशुपालकांना दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा आणि पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव (विक्रम) सावंत यांच्या सहकार्याने हा शेतकरी हिताचा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांच्या हस्ते लाभार्थी शेतकरी व पशुपालकांना मोफत मका बियाण्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर, पारगावचे सरपंच महेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य समाधान मोटे, चेतन तातुडे, शिवसेना शाखाप्रमुख बाबासाहेब हारे, शिवसेना नेते कुंडलिक आखाडे, पोपट सुरवसे, अशोक जाधव, महेश आटोळे, शरद मोटे, महेश कोकणे, कांतीलाल कोकणे, महादेव मलंगनेर, चेतन कोकणे, समाधान माळी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तांबडे यांच्यासह विभागाचे कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पशुपालकांना चारा उत्पादनासाठी आवश्यक बियाणे उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. शेतकरी व पशुपालकांच्या हितासाठी अशा योजना सातत्याने राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.