परंड्यात ANTF ची धडक कारवाई; ५७ हजारांहून अधिक किमतीच्या अंमली गोळ्यांसह एक जण जेरबंद


 परंड्यात ANTF ची धडक कारवाई; ५७ हजारांहून अधिक किमतीच्या अंमली गोळ्यांसह एक जण जेरबंद

परंडा | प्रतिनिधी

अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), छत्रपती संभाजीनगर विभागाने परंडा शहरात मोठी कारवाई करत ५७ हजार २०० रुपये किमतीच्या अंमली पदार्थांच्या गोळ्या जप्त केल्या. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ANTF च्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह १५ जून रोजी परंडा येथील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात सापळा रचला. यावेळी शाहिद सादिक शेख (वय ३९, रा. परंडा, जि. धाराशिव) यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान त्याच्याकडून Nitcor-10 (Nitrozepam) या घटकाच्या १५ गोळ्या किंमत ६ हजार रुपये, Nizascen-10 (Nitrozepam) या घटकाच्या १० गोळ्या किंमत ४ हजार रुपये तसेच Anzilum 0.5 (Alprazolam) या घटकाच्या ९३ गोळ्या किंमत ३७ हजार २०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी वापरला जात असल्याचा संशय असलेला एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला.

एकूण ५७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून संशयिताविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९०/२०२६ अन्वये NDPS Act तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंह, पोलीस अधीक्षक अजित टिके, अपर पोलीस अधीक्षक माईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीता वागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सफी वाहित मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार सुरेश राजूत, नागेश चव्हाण, निलेश सरपाळे, हरीशचंद्र मुंढे आणि ज्योती गिरीगार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

परंडा शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर लगाम घालण्यासाठी ANTF कडून सुरू असलेल्या कारवायांमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया आणखी तीव्र करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!