पोस्ट ऑफिस ते बाजार चौक रस्त्याचे काम दिवाळीनंतर सुरू होणार

पोस्ट ऑफिस ते बाजार चौक रस्त्याचे काम दिवाळीनंतर सुरू होणार

गैरसमज व अफवा पसरविणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे रवी प्रल्हाद मुंडे यांचे आवाहन

धाराशिव : पोस्ट ऑफिस ते बाजार चौक या मुख्य रस्त्याच्या कामाबाबत काहीजणांकडून गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात असल्याचे समोर येत आहे. मात्र, या रस्त्याचे काम दिवाळीनंतर सुरू होणार असल्याची माहिती आहे.

पोस्ट ऑफिस ते बाजार चौक हा परिसरातील प्रमुख बाजारपेठेचा रस्ता असल्याने या मार्गावर नागरिक, व्यापारी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत चुकीची किंवा अपुरी माहिती पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. विकासकामांबाबत गैरसमज पसरविण्याऐवजी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन रवी प्रल्हाद मुंडे यांनी केले आहे.

परिसराच्या विकासासाठी सुरू होणाऱ्या कामांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. समाजात चुकीची माहिती पसरविण्याऐवजी नागरिकांनी सत्य माहितीला प्राधान्य देत परिसराच्या विकासासाठी सहकार्य करावे, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!