अचानक निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचीच एवढी धास्ती का? डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नावाने विरोधकांची धडधड वाढली?

अचानक निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचीच एवढी धास्ती का? डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नावाने विरोधकांची धडधड वाढली?
‘अचानक उमेदवारी’वर टीका करणाऱ्यांना मतदारांचा सवाल; निवडून आलेल्यांनी आजवर नेमके काय केले, याचाही हिशेब द्या!
धाराशिव | प्रतिनिधी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून, उमेदवारांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीवरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर अचानक निवडणूक लढवणाऱ्यांची एवढी धास्ती का घेतली जात आहे? असा सवाल आता मतदारांमधून उपस्थित होत आहे.
निवडणुकीत कोणाला संधी द्यायची, हे ठरवण्याचा अधिकार मतदारांचा आहे. मात्र, उमेदवाराच्या कामाचा, विचारांचा आणि भविष्यातील भूमिकेचा विचार करण्याऐवजी त्याच्या उमेदवारीवरच प्रश्न उपस्थित करणे कितपत योग्य, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
निवडून आलेल्यांनी आजवर नेमके काय दिवे लावले?
वर्षानुवर्षे पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी आजपर्यंत पदवीधरांच्या प्रश्नांसाठी नेमके काय केले, किती प्रश्न मार्गी लावले आणि बेरोजगार तरुणांना कितपत न्याय मिळवून दिला, याचाही हिशेब जनतेसमोर मांडला पाहिजे.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नावाने विरोधकांच्या मनात धडकी भरतेय की काय? असा सवाल उपस्थित करत, उमेदवाराला कमी लेखण्यापेक्षा स्वतःच्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचे आव्हान त्यांच्या समर्थकांकडून दिले जात आहे.
आता पदवीधर मतदार केवळ आरोप-प्रत्यारोपांना महत्त्व देणार की काम, नेतृत्व आणि भविष्यातील अपेक्षांच्या आधारे मतदान करणार, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल.
दैनिक त्रिशक्ती — निष्पक्ष नजर… निष्पक्ष खबर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!