रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता? धाराशिव–ढोकी मार्गाची चाळण! ( सय्यद कलीम मुसा )

दैनिक त्रिशक्ती | विशेष वृत्त
रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता? धाराशिव–ढोकी मार्गाची चाळण!
 सय्यद कलीम मुसा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह; अधीक्षक अभियंत्यांपासून उपविभागीय अभियंत्यांपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांना जाग कधी येणार?
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव–ढोकी मार्गावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 अधिकारी नेमके करतात तरी काय? सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंता यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष दिले आहे का? रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्ती करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे.
 अपघाताचा धोका; वाहनचालक त्रस्त! रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. परिसरातील शेतकरी आणि दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जबाबदार अधिकाऱ्यांना जाग कधी येणार? केवळ कागदोपत्री कामकाज न करता संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
 व्हिडिओ चित्रीकरण आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया! रस्त्याच्या दुरवस्थेचे प्रत्यक्ष चित्रीकरण करण्यात आले असून, वाहनचालकांच्या प्रतिक्रियाही नोंदविण्यात आल्या आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर समस्येची दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
रस्ता दुरुस्त होणार कधी? जबाबदार अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!