लोहगावात महादेव लिंग व नंदी मूर्तीची भव्य मिरवणूक ---लोहगाव : प्रतिनिधी /महेबुब शेख

लोहगावात महादेव लिंग व नंदी मूर्तीची भव्य मिरवणूक ---

लोहगाव : प्रतिनिधी /महेबुब शेख 

रविवारी विधिवत मूर्ती स्थापना ,व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे.
===========≠
मठाच्या जागेवरती नविन आकर्षक बांधकाम व कंपाउंड केले आहे तसेच सर्व परीसर सुंदर सजावट करण्यात आली आहे.
=====================================
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे महादेव लिंग व नंदी मूर्तीच्या स्थापना सोहळ्यानिमित्त शुक्रवार (दि. २८) रोजी दोन्ही मूर्तींची गावातून भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कळसधारी महिला, भजनी मंडळाचे सदस्य, वारकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणुकीदरम्यान भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतल्याने गावात धार्मिक व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मिरवणुकीनंतर महादेव लिंग व नंदी मूर्ती एक दिवस पाण्यात ठेवण्यात आले असून, त्यांना पांढऱ्या वस्त्रांनी झाकण्यात आले आहे.

शनिवार (दि. २९) रोजी दोन्ही मूर्ती धान्यात ठेवण्यात येणार असून, मूर्ती स्थापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दररोज रात्री जागरण व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

रविवार (दि. ३०) रोजी विधिवत महापूजा करून महादेव लिंग व नंदी मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास लोहगावसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!