'जिजामाता कृषी भूषण' पुरस्कार विजेत्या सौ. प्रतिभा काळे यांचा सत्कार; कृषी क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी – ओमराजे निंबाळकर.

'जिजामाता कृषी भूषण' पुरस्कार विजेत्या सौ. प्रतिभा काळे यांचा सत्कार; कृषी क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी – ओमराजे निंबाळकर
धाराशिव : मराठवाडा संयोजक, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र तथा माजी जिल्हाध्यक्ष भाजप धाराशिव आणि निवडणूक प्रमुख श्री. नितीन काळे यांच्या मातोश्री सौ. प्रतिभा रामराव काळे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या 'जिजामाता कृषी भूषण पुरस्कार' निमित्त त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सौ. प्रतिभा काळे यांचे कृषी क्षेत्रातील योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. शेतकरी हितासाठी त्यांनी केलेले कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ कृषी क्षेत्राला होत राहावा, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी श्री. नितीन काळे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी घेतलेल्या परिश्रमांची आठवण काढत त्यांचे योगदानही गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, "माझा विरोध कोणत्याही राजकीय पक्षाला नाही. माझा विरोध हा राजकारणातील नीच प्रवृत्ती, द्वेषाचे राजकारण आणि समाजहिताला बाधा आणणाऱ्या विचारसरणीला आहे. समाजाच्या विकासासाठी सकारात्मक राजकारणाची गरज आहे."
या प्रसंगी श्री. सोमनाथ गुरव, श्री. रामरावजी काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सौ. प्रतिभा काळे यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!