दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबाला तानाजीराव सावंतांचा आधार

दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबाला तानाजीराव सावंतांचा आधार

( सय्यद कलीम मुसा )

सिंदफळ येथील गुणवंत क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत; शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग न स्वीकारण्याचे भावनिक आवाहन

तुळजापूर : दुष्काळ आणि नापिकीच्या संकटामुळे सिंदफळ, ता. तुळजापूर येथील शेतकरी गुणवंत गणपत क्षीरसागर यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी क्षीरसागर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत तातडीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

सावंत यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंदफळ येथे प्रत्यक्ष जाऊन २ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश क्षीरसागर कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. संकटाच्या या कठीण काळात पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर तानाजीराव सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन केले. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि दुष्काळाच्या संकटामुळे परिस्थिती कितीही कठीण झाली, तरी त्याचा सामना सर्वांनी एकजुटीने आणि धैर्याने करावा. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये आणि आपल्या कुटुंबाला पोरके करू नये, असे त्यांनी आवाहन केले.

‘तुमचे अश्रू पुसण्यासाठी आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी मी अहोरात्र कटिबद्ध आहे,’ असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. तसेच संकटाच्या प्रसंगी शेतकरी बांधवांनी स्वतःला एकटे समजू नये, मदतीसाठी पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या अडचणींच्या काळात त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका स्पष्ट करत सावंत यांनी ‘अर्ध्या रात्रीही मदतीची गरज भासली, तरी तुमचा हा लाडका भाऊ तानाजी सावंत तुमच्या हाकेला धावून येईल,’ असा विश्वास दिला.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे भूम सभापती प्रवीण देशमुख, माजी युवासेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, तुळजापूरचे युवा नेते ओम जगदाळे, दिगंबर गव्हाणे, शंभू मनगिरे, राहुल शिंदे, याकूब इनामदार, मनोज क्षीरसागर यांच्यासह स्थानिक गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

— प्रा. डॉ. तानाजीराव सावंत
माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य
आमदार, परंडा विधानसभा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!