खसापुरीतील देशमुख कुटुंबाला माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या कडून आर्थिक मदत

खसापुरीतील देशमुख कुटुंबाला तानाजीराव सावंत यांच्या कडून आर्थिक मदत
 
सय्यद कलीम मुसा ==

दुष्काळ, नापिकी आणि पेपरफुटीच्या संकटामुळे प्रथमेश देशमुख यांनी उचलले टोकाचे पाऊल; देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर

परंडा : खसापुरी येथील गुणवंत कै. प्रथमेश देशमुख यांनी दुष्काळ व नापिकीच्या संकटासोबतच पेपरफुटीच्या घटनेमुळे टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने खसापुरीसह संपूर्ण परंडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, एका होतकरू युवकाच्या दुर्दैवी निधनामुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांनी देशमुख कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या दुःखात सहभागी होत आर्थिक मदतीचा हात पुढे केला. संकटाच्या काळात देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत सावंत साहेबांनी आर्थिक मदत जाहीर केली.

यावेळी गृह (शहरे), महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री नामदार योगेश कदम साहेब यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळ, नापिकी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित गंभीर प्रश्नांमुळे एका कुटुंबावर आलेले हे संकट अत्यंत वेदनादायी असून, देशमुख कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी समाजानेही आधार देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!